मुगावडेच्या डोंगरावर सापडला अनोळखी मृतदेह

मृतदेह डोंगरावरून खाली आणताना दमछाक, करावा लागला बिकट व खडतर रस्त्यावरून प्रवास

पौड : मुगावडे येथील डोंगर पठारावर अनोळखी मृतदेह कुजलेल्या व वाळलेल्या अवस्थेत सापडला. पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे यांनी या संदर्भात 112 क्रमांकावर संपर्क करून कळवले होते. त्यानुसार याचा शोध घेऊन अत्यंत बिकट, खडतर रस्त्याने मोठ्या शिताफीने हा मृतदेह डोंगरावरून खाली आणावा लागला.

     याबद्दल मिळालेली सविस्तर माहिती अशी की, डोंगर पठारावर काही मुलं सुट्ट्या असल्यामुळे करवंद व अळूची पाने आणण्यासाठी गेली होती. तेव्हा अळूच्या पानांपाशी एक मृतदेह त्यांना दिसून आला. त्यांनी संबंधीत गोष्ट शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांना सांगितली. त्यांनी पोलिसांशी संपर्क करून याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांनी डोंगरावर जाऊन शोध घेतला.

     मयत व्यक्तीचे मांस जंगली प्राण्यांनी खाऊन टाकले होते. तर फक्त हाडं शिल्लक होती. उन्हामुळे पूर्णपणे सुकून व करपून गेली होती. इतक्या भयंकर अवस्थेतील बॉडी डोंगरावरून खाली आणण्याचे मोठे दिव्यच होते. पुढील तपासासाठी व पंचनाम्यासाठी ससून रुग्णालयात बॉडी पाठवायला लागणार होती.

     डोंगरावरून धड चालताही येत नव्हते, तीव्र उत्तरामुळे चालतानाही घसरून पडावे लागत होते. प्रत्येक जण वरून खाली येताना पडला होता. अशा परिस्थितीत अत्यंत बिकट रस्त्याने मृतदेह उचलून आणण्याची धुरा आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकावडे तसेच सचिन डेरे यांनी सांभाळली. तर वरून खाली येताना मुगावडे गावचे पोलीस पाटील चैतन्य वाकणकर हे जखमी देखील झाले. या रेस्क्यू घटनेची माहिती वाकणकर यांनीच दिली.

     या शोधमोहीम व तपासासाठी पौड पोलिसांचे पथक होते. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस निरीक्षक बी एस कांबळे, काळे साहेब, सुपे साहेब, गणेश पवार, निखिल गायकवाड, सहभागी झाले होते. तर शिवसेना नेते प्रकाश भेगडे, ग्रामस्थ साहेबराव भेगडे, सोमनाथ खाणेकर देखील सहभागी झाले होते.

     दरम्यान हा मृतदेह हा एखाद्या गुराखी गड्याचा असण्याची व तीव्र उन्हामुळे भुकेने व्याकूळ होऊन जीव गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 .............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)