खारावडे येथे मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

येथील श्री म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात १७ जोडपी विवाहबद्ध

खारावडे : येथील श्री म्हसोबा भैरवनाथ, काळूबाई, शंकर महादेव मंदिरांच्या प्रांगणात मोफत बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी गेल्या २० वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरु आहे. सलग २० वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन म्हसोबा देवस्थान ट्रस्ट व चंद्रकांत आण्णा भरेकर मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

     आयोजक चंद्रकांत आण्णा भरेकर यांनी सांगितले की, सध्याच्या काळात लग्नासाठी होणार प्रचंड खर्च ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना परवडणारा नसतो. तरी देखील काही कुटुंबे कर्ज काढून विवाह करीत असतात. खोटी पत व प्रतिष्ठा जपण्यासाठी पालकांची उठाठेव असते. या विवाहांना योग्य दिशा मिळावी म्हणुन २००३ पासून मुळशी तालुक्यात बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यास सुरूवात केली. या विवाह सोहळ्यास पुणे जिल्ह्यातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.

     या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना आयोजकांकडून संपूर्ण पोशा, संसारोपयोगी भांड्यांचा संच भेट देण्यात आले. तसेच आलेल्या सर्व वर्हाडी मंडळींसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

     तसेच याठिकाणी विवाह सोहळ्याचे औचित्य साधून भरेकर कुटुंबाच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले. १०० हून अधिक ग्रामस्थांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला. व १५ ग्रामस्थांनी रक्तदान केले. तसेच आलेल्या सर्वांसाठी प्राध्यापक गणेश शिंदे यांची व्याख्यान झाले.

     या विवाह सोहळ्यास वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी कालीपुत्र कालीचरण महाराज, माजी खासदार अशोकराव मोहोळ, आयोजक चंद्रकांत भरेकर, देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकरराव मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणेविठ्ठल भरेकर, किरण भरेकर, गणेश भरेकर, सुरेश भरेकर, दत्तात्रय मोहोळ, रमेश चोरघे, सुभाष रोकडे, विकास शिंदे तालुक्यातील सर्व राजकीय नेते, म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

 .............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)