चंद्रकांत भरेकर मित्र परिवार व श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट (खारावडे) यांचे आयोजन
पुणे : सलग विसाव्या वर्षी मुळशी तालुक्यात मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन चंद्रकांत भरेकर मित्र परिवार व श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट (खारावडे) यांनी केले आहे. मुळशीमधील खारावडे येथील श्री म्हसोबा देवस्थानच्या परिसरात रविवारी २० एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
यंदा या सोहळ्याचे हे २० वे
वर्ष असून विवाहासाठी वधुवरांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. तसेच
सर्व जातीधर्मांच्या मुलांमुलींचे विवाह लावले जात आहेत. या सर्व खर्च चंद्रकांत
भरेकर मित्र परिवार करणार आहे.
यंदाच्या विवाह सोहळ्याची
अधिक माहिती देताना चंद्रकांत भरेकर यांनी सांगितले की, सध्याच्या काळात
लग्नासाठी होणारा प्रचंड खर्च ग्रामीण व शहरी भागातील सामान्य कुटूंबाना परवडणारा
नसतो. तरी देखील काही कुटुंबं कर्ज काढून असे विवाह करीत असतात व कर्जबाजारी होत
असतात. त्यामुळे अनेकदा हुंडाबळीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खोटी
सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पालकांची उठाठेव असते. या विवाहांना योग्य दिशा
मिळावी म्हणून २००३ पासून मुळशी तालुक्यात बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यास
सुरुवात केली, त्यास पुणे जिल्ह्यातून अनेकांनी प्रतिसाद व प्रोत्साहन दिले आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात
वधू वरांना आयोजकांकडून संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांड्यांचा संच भेट देण्यात येणार
आहे. १५ हजार वऱ्हाडी मंडळी, सकाळी ११ ते ४ जेवणावळ, गतवर्षी शुभमंगल
झालेल्या सुखी दांपत्यांची उपस्थिती, सर्व पक्षांच्या नेत्यांची हजेरी, आरोग्य चिकित्सा
शिबिर व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
तसेच गुरुवर्य सुदामजी गोरखे
गुरुजी हे वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. हे या विवाह
सोहळ्याचे वैशिष्ट यंदाही असणार आहे.
समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी
चंद्रकांत भरेकर यांनी स्वतःचा मुलगा किरण भरेकर याचे सामुदायिक विवाहातच लग्न
लावले. किरण हे उच्चशिक्षित असून बांधकाम व्यवसायिक आहेत.
सामुदायिक विवाह सोहळे हे
यंदा गावोगावी साजरे करावे, असे आवाहन या सामाजिक कार्याचे प्रणेते चंद्रकांत
भरेकर यांनी केले आहे. गावांनी पुढाकार घेऊन एकाच मंडपात ५ लग्ने लावली तर त्याचा
खर्च देण्याची तयारी भरेकर मित्र परिवाराने ठेवली आहे.
विवाह सोहळ्यासाठी सुभाष
रोकडे, संकल्प ग्रुप, किनारा हॉटेल समोर, कोथरुड, वनाझ कंपनी जवळ, पुणे. मोबाईल
नंबर ९८२२७४३९१० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)