शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी, शिवसेनेची मागणी

पौड : मुळशी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने मुळशी तहसिल कार्यालयाला निवेदन देण्यात आले. मुळशी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे आणि तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

    मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागले. त्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, त्याची सुद्धा भरपाई मिळावी यासंदर्भातले निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना शिष्टमंडळाला तालुक्याचे तहसीलदार रजीत भोसले यांनी लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत दिली जाईल,से आश्वासन दिले.

    यावेळी मुळशी शिवसेनेचे राम गायकवाड, शिवसेना मुळशी तालुका संघटक हनुमंत सुर्वे, दत्ता गोरे, ॲडवोकेट धनंजय टेमघरे, काळूराम गोडांबे, प्रदीप कालेकर, दत्तात्रय देवकर, सिताराम फाले, आबा रणवरे उपस्थित होते.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)