राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरेंचा दावा, जेधे-नाईक वंशज प्रकरण
पौड : भोर मतदारसंघात १ हजार ६०० कोटींची विकासकामे आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. हीच बाब विरोधकांना खपत नसल्याने त्यांनी मांडेकर यांना या ना त्या कारणाने बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा दावा, मुळशी तालुका राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
भोर येथील
कान्होजी नाईक-जेधे यांचे वंशज रणधीर जेधे हे काही दिवसांपूर्वी आमदार शंकर
मांडेकर यांच्या मुळशी येथील कार्यालयामध्ये गेले होते. नाईक-जेधे यांच्या
ऐतिहासिक वाड्याचे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून महाराष्ट्र राज्य प्रशासनाला
काही प्रस्ताव सादर करावयाचे असल्याने त्या प्रस्तावाची प्रत सोबत नेली होती.
तत्पूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत प्रस्ताव सादर
केला असता त्यांनी स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून तो प्रस्ताव पाठवण्याची
माहिती दिली होती. त्यामुळे ही प्रत मांडेकरांकडे गेली असता त्यांनी देखील
आजी-माजी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करतो असे
सांगितले. यावर जेधे यांना मोठा राग येऊन त्यांनी सदर प्रस्तावाची प्रत फाडून पायदळी
तुडवून अशोभनीय कृत्य केले. त्यांच्या या अशोभनीय कृत्यावर मांडेकर यांनी तीव्र
नाराजी व्यक्त करत केवळ नरवीर कान्होजी नाईक-जेधे यांचे वंशज असल्याने असे कृत्य
करायला नको होते, हे अजिबात पटले
नसल्याचे सांगितले. असे अंकुश मोरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आमदार
म्हणून निवडून आल्यानंतर शंकर मांडेकर यांच्या कार्यकाळामध्ये भोर राजगड मुळशी
मतदारसंघात गाववाडी वस्तीवर अंदाजे १६०० कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून विकास
निधी मंजूर झाला आहे व ती विकास काम होत असल्यामुळे राजकीय विरोधक त्यांना बदनाम
करण्याचे षडयंत्र करत असल्याची शंका मोरे यांनी व्यक्त केली आहे. आमदार मांडेकर हे
संत, राजे, महाराजे, हुतात्मे, शूरवीर मावळे यांचा नेहमीच आदर करणारे
व्यक्तिमत्व आहेत. मतदारसंघातील जनतेशी प्रेमाने व आपुलकीने तसेच नम्रतेने वागणारे
व्यक्तिमत्व असून त्यांच्या विकास कामाचा धडाका पाहून विरोधक त्यांना नाहक बदनाम
करण्याचे षडयंत्र करीत आहे.
रणवीर जेधे
यांनी आमदार मांडेकर यांची काही वृत्तपत्र, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आरोप करून त्यांना
बदनाम करीत असून सदर आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे व आमदार मांडेकर यांना त्रास
देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अंकुश मोरे यांनी ठामपणे सांगितले आहे.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)