मुळशी धरण परिसरात रोजगारनिर्मिती व समस्यांवर चर्चा

टाटा धरणाचे अधिकारी व मुळशी धरण विकास मंडळाची बैठक, कार्यवाही करणार

आंबवणे : मुळशी धरण परिसरात विकासात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी बैठक पार पडली. मुळशी धरण विकास मंडळातील सर्व सभासद, धरण भागातील ग्रामस्थ व  टाटा पॉवर कंपनीचे सीएसआरडिपार्टमेंटचे अधिकारी मनोहर म्हात्रे या बैठकीस उपस्थित होते. नियोजित बैठकीत मध्ये अनेक विषयांवर व धरण भागात असणाऱ्या समस्यांवर विस्तृतपणे चर्चा झाली असून त्या सोडवण्यासाठी काय व कसे करता येईल याबद्दल आढावा घेण्यात आला.

रोजगार निर्मिती

    धरण भागातील महिलांना रोजगार निर्मिती होण्याकरता बचत गटातील महिलांना पेपर प्लेट, पत्रावळ्या, द्रोण बनवण्याची मशीन उपलब्ध करून देणे. सोलर वर चालणारी वेफर्स बनवण्याची मशीन, बटाट्याची चिप्स बनवण्याची मशीन, पापड बनवण्याची मशीन उपलब्ध करून देणे. मुळशी धरण भागामध्ये मिळणाऱ्या रानभाज्या व आयुर्वेदिक औषधांसाठी योग्य ते मार्केट उपलब्ध करून देणे किंवा सदर जिन्नस विकत घेऊन मुळशी धरण भागातील नागरिकांना व्यवसाय निर्मिती करून देणे.

    मुळशी धरण भागातील युवा वर्गासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरता मोफत शैक्षणिक प्रशिक्षण म्हणून आयटीआय प्रणालीतून विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, जसे की इलेक्ट्रिशन, प्लंबर, मिस्त्री, कार्पेन्टर, त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट मधून हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल नर्सेस, मेल नर्से यासारखे आणखी बरेच कोर्सेस टाटा पॉवर कंपनीच्या वतीने मोफत उपलब्ध करून देणे.

गावांत विकासकामे व दुरुस्तीची कामे करणे

    मुळशी धरण भागात ज्या ज्या गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाहीत व जागे अभावी स्मशानभूमीचे काम राहून गेलेले आहे, अशा सर्व गावांमध्ये टाटा कंपनीच्या जागेमध्ये टाटा कंपनीच्या माध्यमातून स्मशानभूमी बांधून देणे.

    धरण भागातील ज्या ज्या गावांमध्ये शाळा खराब अवस्थेत आहे, आशा शाळेची दुरुस्ती करणे तसेच त्या शाळेतील मुलांसाठी टॉयलेटची बांधून देणे. धरण भागातील प्रत्येक गावामध्ये रुग्णवाहिकेमधून फिरता दवाखाना सुरू करणे.

    जांभुळकरवाडी व परातेवस्ती येथे घराच्या वरून गेलेली टॉवर लाईन शिफ्ट करणे. आदरवाडी व डोंगरवाडी या गावांना उपलब्ध असलेल्या टाटाच्या पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देणे. कुंभेरी, तिस्करी, आंबवणेमध्ये पाणलोट भागामध्ये सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या नावेसाठी कायमस्वरूपी पगारी कामगार उपलब्ध देणे, या गोष्टी करण्यावर चर्चा करण्यात आली.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी वरील सर्व विषयांवर विस्तृतपणे चर्चा केली व सामोपचाराने मार्ग काढला आहे. उपस्थित टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरील सर्व मागण्यांवर येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये सर्व परवानगी घेऊन मार्च महिन्यापासून सर्व कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

    या बैठकीमध्ये आमदार शंकर मांडेकर यांनी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. तसेच या बैठकीस नंदू वाळंज, मिलिंद वाळंज, एकनाथ दिघे, आबासाहेब मरवडी, किसन मरवडी, लक्ष्मण हुंडारे, वसंत फाटक, संतोष कदम, राजू ओव्हाळ, सिद्धार्थ मोरे, राजू बोडके, सुनील बोडके, नथू सोनार, दत्ता अर्जुन पाठारे, विश्वनाथ दिघे, गोविंद सरूसे, तानाजी दिघे, निलेश मेंगडे, प्रवीण माताळे उपस्थित होते. यावेळी मुळशी धरण विकास मंडळाच्यावतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)