मुळशीतील वाहतुक समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या
बावधन : घोटवडे फाटा याठिकाणी बंद पडलेले सिग्नल सेवा चालू करण्यात यावी, अशी मागणी युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. बावधन पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना यामागणीसह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
सततच्या
वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या विभागात
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तसेच अवजड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात या
रस्त्यावरून होत असते.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क असणे फार गरजेचे आहे.
घोटवडे
फाटा याठिकाणी मोठा आणि महत्वाचा चौक असून या ठिकाणी ट्रॅफिक मोठया प्रमाणात होते.
त्यामुळे येथे सिग्नल यंत्रणा बसवण्याची व कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची
प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच
भुगाव, पिरंगुट येथेही कायम स्वरुपी ट्रॅफिक पोलीस
थांबवण्यात यावेत. तसेच ठिकठिकाणी स्पीड लिमिट बोर्ड लावण्यात यावेत. ठराविक
ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील या विभागात बसविण्यात यावेत. शनिवार-रविवारी
बेशिस्त पर्यटक यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. परिसरात कायमस्वरुपी ट्रॅफिक
पोलिस असावेत त्यामुळे ट्रॅफिक जॅम समस्या होणार नाही, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या
आहेत.
यावेळी
शिवसेनेचे (उबाठा) उपजलिहासंघटक सचिन दगडे, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुंडले, सागर पवळे, संतोष पवळे, विनोद दगडे, आशिष वेडे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)