श्री काळभैरवनाथ कुस्ती दंगल २०२५ स्पर्धेचे करमोळी ग्रामस्थांतर्फे प्रथमच आयोजन
पौड : करमोळी, ता. मुळशी येथे होळीच्या उत्सवानिमित्त श्री कालभैरवनाथ कुस्ती दंगल २०२५ स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या नंबरची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन अभिजित भोईर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन निलेश केदारी यांच्यात आज शुक्रवार, दि.१४ मार्च रोजी होणार आहे.
करमोळी येथे आज सायंकाळी ४ नंतर या सर्व कुस्त्याना सुरवात होणार असल्याची माहिती कुस्ती दंगलचे संस्थापक संदीप राजेंद्र केदारी यांनी दिली. या पहिल्या नंबरच्या कुस्तीसाठी निलेश आल्हाट, अनिल जाधव, योगेश मुरकुटे, निलेश सुर्वे यांच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये व गदा देण्यात येणार आहे. तसेच पृथ्वीराज पाटील विरुद्ध सागर देवकाते, वैभव तांगडे विरुद्ध सौरभ शिंदे, प्रथमेश मारणे विरुद्ध शंतनू बांदल या मोठ्या कुस्त्या होणार असून, श्रेया परदेशी विरुद्ध प्रीती शिर्के ही महिलांची कुस्ती तसेच इतर एकूण ३३ कुस्त्यादेखील होणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजक शरद केदारी,अमोल केदारी, दिनेश केदारी, महेश अल्हाट, सचिन केदारी, प्रणित केदारी, दिलीप केदारी, अनिल केदारी, आदेश केदारी, समीर केदारी, तुषार जाधव, दिगंबर केदारी, समीर प्रभाकर केदारी, शशिकांत जायगुडे, सुहास केदारी, रवींद्र जायगुडे, ऋषिकेश जाधव यांनी केले असून पंच म्हणून दत्ता रुकर, अमित पिंगळे,अमित मस्के, बाप्पू भागवत, संजय दाभाडे, जालिंदर कुदळे काम पाहणार आहेत. तर या कुस्तीसाठी संतोष ज्ञा. केदारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी
आमदार शंकर मांडेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ तालीमचे अध्यक्ष गोविंद आंग्रे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटी समन्वयक मधुर दाभाडे, राष्ट्रवादीचे बाबाजी शेळके, ऍडवोकेट रमेश केदारी, उद्योजक राजेंद्र दोशी, समीर सदावर्ते, प्रभाकर साळुंके यांचा
सन्मान करण्यात येणार असल्याचे संस्थापक संदीप केदारी यांनी सांगितले.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)