पौडमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा थाटच न्यारा
पौड : चारचाकी वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या सर्वत्र जाणवत आहे. मात्र म्हणून चारचाकी कशीही, कुठेही पार्क करावी हे मात्र योग्य नाही. पौड, ता.मुळशी येथे एक शासकीय कर्मचारी रोज, नित्यनियमाने दुचाकी पार्किंगच्या जागेवर डल्ला मारून आपली स्वतःची चारचाकी पार्क करत आहे. या सरकारी बाबूचा थाटच न्यारा असून, सरकारी सेवेत असणे म्हणजे सगळीकडे राजाबाबू असणे असा याचा गोड गैरसमज झालेला दिसत आहे.
पौड, ता.मुळशी येथे अनेक शासकीय कार्यालयं आहेत.
मुळशी तहसील आवाराच्या बाहेर पौड ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुचाकी
पार्किंगची जागा आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या
दुचाकी तेथे लागणे अपेक्षित असते. मात्र येथील शेजारील एका शासकीय कार्यालयातील
कर्मचारी दुचाकी पार्किंगवर मालकी हक्क असल्यागत स्वतःची चारचाकी रोज येथे लावत
आहे. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांची गैरसोय होत आहे.
त्यात हा
कर्मचारी सरकारी कार्यालयातील असल्याने याला बोलणार कोण? असा प्रश्न पडत असल्याने या कर्मचाऱ्याचे
चांगलेच फावले आहे. दुचाकीच्या गराड्यात बरोबर मध्येच याची मारुती कंपनीची छोटी
चारचाकी पार्क केलेली असते. यावर पौड पोलिसांनी कारवाई करून दुचाकीच्या
पार्किंगमध्ये कोण चारचाकी लावत असेल तर त्यालाही दंडात्मक कारवाई करावी. या
गाडीवाल्यामुळे इतर अनेक जण त्याचे अनुकरण करण्याची शक्यता असून यावर पौड पोलिसच
आळा घालू शकतात.
तर वाहतुक विभागातील
राजेश गायकवाड यांनी कळवले आहे की, पौड येथील तहसील कार्यालय
आवारात तसेच तहसील कार्यालय समोर व रुग्णालयाच्या दिशेने अस्ताव्यस्त वर आधारलेला
अडथळा होईल अशा पद्धतीने पार्किंग केलेल्या सर्व वाहनांवर सोमवार दिनांक ३ मार्च रोजी एकूण ३७ केसेस करून सदर वाहनांवर ३२ हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. मात्र तहसिल आवाराबाहेर दुचाकी पार्कींगमध्ये दररोज उभ्या असणार्या पांढर्या
मारूती कारवर पौड पोलिसांनी काय कारवाई केली, अद्याप याची माहिती मिळाली नाही.
मात्र याच कारवर याआधी डिसेंबर व जानेवारी महिन्यात मात्र इतर ठिकाणी इतर बाबतीत कारवाई
झालेले चलन ऑनलाईन पहायला मिळते.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)