हिंजवडीत बसला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू

आयटीतील कंपनीची बस, दरवाजा न उघडल्याने दुर्दैवी घटना

हिंजवडी : टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी, ता. मुळशी येथे घडली आहे. हिंजवडी फेज वन येते आज पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. 

          आयटीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १२ कर्मचारी टेंपो ट्रॅव्हलरमधून प्रवास करत होते. त्यावेळी या बसला अचानक आग लागली. त्यानंतर चालक व इतर कर्मचारी तातडीने खाली उतरले, मात्र मागचे दार न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इतर जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

          आयटीस्थित व्योमा ग्राफिक कंपनीचे कर्मचारी हे आज सकाळी कंपनीत जाण्यासाठी प्रवास करत असताना कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने प्रवास करत असलेल्या १२  कर्मचाऱ्यांपैकी काहींना आपली याच्यातून सुटका करून घेता आली, मात्र दरवाजा न उघडल्याने चार जणांना मृत्यूस सामोरे जावे लागले. घटना घडत असताना परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी बचावाच्या शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)