भोरमधील रायरेश्वराच्या पायथ्याला फोडणार प्रचार शुभरंभाचा नारळ
बावधन : भोर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना बावधन गावाने जाहीर पाठिंबा दिला असून सर्वांनी एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण गावाची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय झाला आहे.
बावधन गावामध्ये जरी अनेक पक्षांचे कार्यकर्ते असले तरीही आम्ही स्थानिक नेतृत्व म्हणून किरण दगडे पाटील यांनाच मतदान करणार असल्याचे ग्रामस्थांनी या बैठकीमध्ये ठरवले आहे. किरण दगडे पाटील यांनी गावाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. बावधन गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केलेली आहेत. यामध्ये क्रीडा संकुल, रस्ते, फुटपाथ, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडविलेला आहे. आता भोर वेल्हा (राजगड )मुळशी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य कर्मभूमी मध्ये विकास कामे करायची आहेत.
जी कामे गेल्या दोनशे वर्षांमध्ये झालेली नाहीत ती कामे यावेळी मला करायची आहेत असे यावेळी किरण दगडे यांनी सांगितले. भोर विधानसभा मतदारसंघातील भोरमधील एमआयडीसी तसेच ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे २७ वर्ष वास्तव्य होते आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड तसेच स्वराज्यामध्ये पहिला किल्ला आला तो तोरणा गड यांची झालेली दुरावस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे. त्यामध्ये मला सुधारणा करायचे असून हे महत्त्वाची कामे जर मार्गी लागली तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय उदयस येईल तसेच छत्रपती शिवाजी सुरुवातीची कर्मभूमी जी जगापासून आजही अंधारात ठेवलेले आहे ती पुन्हा सुजलाम सुफलाम होईल.
आज भोर मध्ये सर्वसामान्य जनतेने मोठ्या सभेचे आयोजन केले असल्याचे किरण दगडे यांनी सांगितले. याचवेळी प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्याच ठिकाणी जाऊन श्री रायरेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
...............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)