पंजाला निवडून आणायला तुतारी अन मशाल झटली

शिवसैनिक व राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्ष संग्राम थोपटेंच्या प्रचारात आघाडीवर

पौड : विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. भोर विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी (शरद पवार गट) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक जीवाचे रान करत आहेत. थोपटेंना निवडूनच आणायचे आणि मुळशीतून मताधिक्य द्यायचे हा चंगच सर्वांनी बांधला आहे.

     महाविकास आघाडीच्या संग्राम थोपटे यांना निवडून आणायचे या हेतूने आघाडीच्या कार्यकर्त्यानी एक विचाराने नियोजनबद्ध असा प्रचार सुरु केलेला आहे. मुळशीत गेल्या ३ विधानसभेत चढत्या क्रमाने हॅटट्रिक आमदार संग्राम थोपटेंना मताधिक्य लाभले आहे. हेच सातत्य कायम ठेवण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट एकदिलाने प्रचाराच्या मैदानात उतरला आहे.

     शरदचंद्र पवार गटाचे नेते महादेव अण्णा कोंढरे यांची जनमानसातील प्रतिमा, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता दगडे यांचा दांडगा जनसंपर्क, बाबाजी शेळके, अंकुश वाशिवले, भरत सातपुते, भुगावचे दगडू काका करंजावणे, पिरंगुटचे राहुल पवळे, अंकुश साठे, दत्ता दहिभाते, बंडू मेंगडे, विजय येनपुरे, महादेव गोळे, जर्नादन मातेरेसह गौरी भरतवंशी, दिपाली कोकरे, स्वाती वाशीवले, रूपाली अमराळे, सारिका शिंदे, शितल अमराळे यांच्यासारखे धडाडीच्या कार्यकर्त्यांची मनापासूनची साथ यामुळे त्यांच्या पक्षातील पुढची फळी देखील जोरदार प्रचारात उतरलेली दिसत आहे.

     खासदार सुप्रिया सुळे यांना भोर मतदारसंघात ४३ हजारांचे लीड मिळवून दिले होते, आता आमदार थोपटेंना यांना ५० हजारांचे मताधिक्य देण्यासाठी पवार साहेबांची राष्ट्रवादी सज्ज झाली असल्याचे जिल्हा अध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे यांनी सांगितले.

     खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचाही सिंहाचा वाटा होता. शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या प्रेमाखातर ही मंडळी त्यांच्यासोबत जातील असा अंदाज बांधला जात होता, परंतु हे शिवसैनिक आघाडीबरोबरच टिकून राहिले आहेत व त्यांनी थोपटे यांच्या प्रचारात एक पाऊल पुढे ठेवून प्रचाराची धुरा हाती घेतली आहे.    

     शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे, जेष्ठ नेते नानासाहेब शिंदे, अविनाश बलकवडे, स्वाती ढमाले, सागर काटकर, सचिन साठे, प्रकाश भेगडे, भानुदास पानसरे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, माऊली केमसे, नागेश साखरे, बाळासाहेब भांडे, ज्ञानेश्वर डफळ, कैलास मारणे या आघाडीच्या शिलेदारांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गावोगावचे सैनिक पेटून उठलेले आहेत.

     हेच चित्र भोर व राजगड या दोनही तालुक्यात असल्याचे पहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना असल्याने मुळशीतील शिवसैनिक हे महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहेत. खासदार सुप्रिया ताई यांना जशी साथ दिली तशीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना गटाचे मतदान आमदार संग्राम थोपटेंना होणार असल्याचा निर्धार मुळशीतील सच्च्या शिवसैनिकांनी केला असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी सांगितले आहे.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)