संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांना समाजभूषण पुरस्कार

स्व.सुभाषभाऊ अमराळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन, मुळशीभूषण व विशेष पुरस्काराचे होणार वितरण

पिरंगुट : स्व.सुभाष भाऊ अमराळे प्रतिष्ठानच्यावतीने समाजभूषण पुरस्काराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांना हा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. सोबतच विशेष सन्मानार्थी व मुळशी भूषण सन्मानार्थी पुरस्कार देखील दिले जाणार असून सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सुंदरबन कार्यालय, घोटवडे फाटा, पिरंगुट, ता.मुळशी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

       माजी आदर्श जिल्हापरिषद सदस्य स्व. सुभाषभाऊ अमराळे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सचिन सुभाषभाऊ अमराळे व वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे यांनी दिली. समस्त ग्रामस्थ अंबडवेट (पांढर) व स्व. सुभाषभाऊ अमराळे प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले त्याचबरोबर अशोकआण्णा मोहोळ उपस्थित राहणार आहेत. पेरिविंकल स्कुलचे संस्थापक राजेंद्र बांदल, पोलीस निरीक्षक संतोष भुमकर, तहसीलदार अजित गायकवाड, शुभम साहित्याचे राजुशेठ ओंबासे यांचा विशेष सन्मान देऊन गौरव होणार आहे.

       याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा देखील मुळशी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सी.ए. ऋतिक दहिभाते, सी.ए. सानिका दुर्गे, सी.ए. मोनिका शेलार, विक्रमवीर कादंबरी मोहोळ, महाराष्ट्र पोलीस मानसी सावंत, महाराष्ट्र पोलीस प्राजक्ता अमराळे, महाराष्ट्र पोलीस हर्षदा फाले, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न कंधारे, कुस्तीवीर अनुश पिंगळे, विक्रमवीर राजाऊ मराठे, कुस्तीवीर पृथ्वीराज सुतार यांचा गौरव होणार आहे.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)