पुणे : नऊ दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा वानवडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या मैदानात येत्या रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पार पडणार आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात स्थिरता यावी
व त्यांनी संसारी जीवन जगावे यासाठी पुणे महानगर सक्षम ही संस्था प्रयत्नशील आहे.
सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी
संस्था यांच्यावतीने हा सोहळा आयोजित केलेला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या
सोहळ्यासाठी सर्व प्रकारे मदत केली आहे. काहींनी वस्तू रुपात मदत केली आहे तर काही
संसार लागणारी भांडी दिलेली आहेत. काहींनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.
त्याचबरोबर महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेने दिव्यांगाच्या या विवाह सोहळ्यासाठी
जेवणाच्या व्यवस्थेतील काही भाग म्हणून गुलाबजाम व मसालेभात याची व्यवस्था केलेली
आहे.
एका दानशूर व्यक्तीने नवरी साठी लागणारे
मंगळसूत्र अशी नऊ मंगळसूत्रांची व्यवस्था केलेली आहे. काहींनी जोडवी, पैंजण, नथी यांची
व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे समाजातील दानशूर व्यक्तींचा ह्या विवाह सोहळ्यात
खूप मोठा हातभार लागलेला आहे. या सोहळ्यासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित
राहणार आहेत. त्यामध्ये संघाचे प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर, सह प्रांत सेवा प्रमुख महेश करपे, सक्षमचे अखिल
भारतीय कार्यकारी सभेचे सदस्य डॉक्टर अविनाश वाचासुंदर, संस्थेचे
अध्यक्ष माजी खासदार, प्रदीप दादा रावत, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत इत्यादी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी
होण्यासाठी सक्षमचे पुणे जिल्ह्यातील प्रांतातील आणि पुणे महानगरपालिका सक्षमचे
कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, अशी
माहिती सक्षमचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी दिली.
...............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)