पौड : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सहकुटुंब फिरायला बाहेर जात असतात. मात्र असे सहकुटुंब बाहेर जाणे महागात पडू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे हे गरजेचे ठरते. सहकुटुंब बाहेर गेल्याने चोरट्यांना आयतेच कुलूपबंद घर सावज म्हणून भेटू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.
मुळातच बाहेरगावी सहकुटुंब जात असाल तर घरात किंमती वस्तू जसे की दागदागिने, रोख रक्कम ठेवू नये. एकतर त्या वस्तू सोबत न्या किंवा जवळच्या नातेवाईकांकडे ठेवा. जर तुम्हाला ४-५ दिवस बाहेर जायचे असेल तर शक्य असल्यास बँकेत अथवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.
आपण गावी जात असेल तर शेजारच्या कुटुंबांना त्याची कल्पना द्यावी व लक्ष ठेवण्याची विनंती करावी. बाहेरगावी गेल्यानंतर बाहेरगावचे फोटो शक्यतो सोशल मीडियावर टाकू नयेत, स्टेटसला ठेवू नयेत. त्यामुळे तुम्ही किती काळाने घरी येणार आहात याची चोरट्यांना कल्पना येते. बाहेरगावावरून घरी आल्यानंतर सोशल मीडियावर फोटो टाकावेत, त्यामुळे तुमची रोजची माहिती लोकांना त्वरित मिळणार नाही.
परिसरातील नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, काही संशय किंवा अडचण असल्यास स्थानिक पोलिसांना अथवा ११२ नंबरवर फोन करून कळवावे.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)