महायुतीतील इतर इच्छूक उमेदवारांची भेट घेणार
भोर : भोर विधानसभा मतदार संघामधून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
भोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मांडेकरांच्या रॅलीला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ हगवणे, पीडिसीसी बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, माजी उपसभापती सारीका मांडेकर, माजी नगरसेवक सुषमा निम्हण, मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, तालुका युवक अध्यक्ष सागर साखरे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चंदाताई केदारी, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे, पांडुरंग निगडे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, आरपीआयचे श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे, विक्रम बोडके, संग्राम निगडे, मुळशी तालुका युवक अद्यक्ष सुशिल हगवणे, माऊली साठे आदी उपस्थित होतें.
यावेळी माध्यमांशी बोलताना मांडेकर म्हणाले की, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली आहे. मी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते त्या सर्वांची भेट घेणार आहे. आम्ही सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.
त्याच विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरा जाणार आहे. भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या भागात परिवर्तन होणार आहे. त्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्याही मतभेदाचे संभ्रमाचे वातावरण नसल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)