गुटखाविक्री प्रकरण : ठाण्यातील चार खंडणीखोरांना पिरंगुट येथे अटक

पत्रकार व एनजीओचे पदाधिकारी असल्याची बतावणी, दुकानदारही अटकेत

पिरंगुट : येथे गुटखाविक्री करणार्या दुकानदाराकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्या चार जणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी घडली.

     या चौघांपैकी एकाने पत्रकार आणि इतरांनी एनजीओचे कार्यकर्ते असल्याची बतावणी करून दुकानाची झडती घेण्यासाठी दुकानदारावर दबाव आणला. गुटखा सापडताच प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागितली होती. मात्र दुकानदाराने पौड पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली. तर दुकानदारही अवैध गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांच्या कचाट्यात आयताच सापडला. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.  

     पिरंगुट येथे पुना ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी (दि. ११) सकाळी सात ते दुपारी एकच्या दरम्यान आरोपींना दुकानदाराला आम्ही हमारा फाऊंडेशन, ठाणे-कळवा येथील एनजीओचे पदाधिकारी असून एकाने बोगस ओळखपत्र दाखवून पत्रकार आहे, असे सांगितले. त्यानंतर दुकानातील माल तपासताना गुटखा सापडल्याने आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करून दुकान सील करतो असे सांगितले. प्रकरण मिटवायचे असे तर व पोलीस तक्रार करायची नसल्यास प्रथम दहा लाख रोख स्वरूपात खंडणीची मागणी केली. पुन्हा तडजोड करून अडीच लाख रुपये रोख खंडणीची मागणी केली.

     त्यानंतर दुकानदार इमामउद्दीन गफूर खान (वय ३४, पूना ट्रेडींग कंपनी, रा. पिरंगुट; मूळ गाव रेपडावास, पाली राजस्थान) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी खंडणी मागणारे जितेंद्र कमला शंकर शर्मा (रा. नालासोपारा, ठाणे), हिमांशु दुबे, विजय झा व रोहीन केदारसिंग पटेल (तिघे रा. कळवा, ठाणे) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडी व बोगस ओळखपत्र जप्त केली आहे. खान यांचे

     आरोपींपैकी एकावर मुंबई आणि ६ ठाण्यात अशा प्रकारचे एकूण खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. एकाने पत्रकाराचे बोगस कार्ड ठेवले आहे. एकावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून तो कळवा ठाणे येथून फरार होता. त्याला कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे., अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. पुढील तपास सहायक फौजदार सचिन शिंदे हे करत आहे.

अवैध गुटखाविक्री प्रकरणी दुकानदारही अटकेत

     पिरंगुट येथील किराणा मालाच्या दुकानातून बेकायदेशीर गुटख्याची विक्री करणार्या दुकानदाराला पौड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ हजार ८५४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार सिद्धेश्वर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी इमामुद्दीन गफूर खान (वय ३४, रा.पिरंगुट, ता.मुळशी) याला अटक केली आहे. आरोपीचे पिरंगुट येथे पूना ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवार दि.११ रोजी आरोपी हा गुटख्याची विक्री करत असल्याचे आढळून आला.

अवैध गुटखाविक्री रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान

     शासनाने बंदी घालुनही अनेक ठिकाणी अवैध गुटखाविक्री होत असते. त्यामुळे त्याला आळा घालणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. अवैध गुटखाविक्रीतून मोठा महसूल गोळा होत असतो. त्याचं भलंमोठं रॅकेट असल्याचं अनेकदा सिद्ध होत असतं त्या रॅकेटला हाणून पाडण्यासाठी प्रामाणिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची गरज आहे. पोलिसांनी डोळेझाक न करता त्यावर प्रामाणिकपणे कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा गुटखाबंदी ही केवळ कागदावरच राहिल, हे मात्र खरे.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)