उरवडे-मुकाईवाडी ते पिरंगुट या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त

अवजड वाहतुक जबाबदार, युवासेनेच्या अमित कुडलेंचा आंदोनलाचा इशारा

पिरंगुट : उरवडे-मुकाईवाडी ते पिरंगुट या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. या रस्त्याची अवस्था आधीच बिकट असून त्यात अवजड वाहतूकीने अधिकच वाट लावली आहे. इथे केलेला डांबरी रस्ता गायब झाला असून या रस्त्याच्या दुरावस्थेची दुरुस्ती करून अवजड वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्यावतीने अमित कुडले यांच्याकडून करण्यात आली आहे.

     हा डांबरी रस्ता होता, त्याची अवस्था बिकट असतानाच या रस्त्यावर अवजड वाहतूकीचे बरेच पेव वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेला ते अधिकच जबाबदार ठरले आहे. यामुळे डांबरी रस्ता गायबच झाला आहे. दुचाकीने प्रवास करणे म्हणजे माती खाणे अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावर कुठेही डांबर दिसत नाही इतकी भयाण अवस्था या रस्त्याची झाली आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

     लवकरात लवकर या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दुरुस्ती करावी, तसेच अवजड वाहतूकीबाबत देखील योग्य ती कारवाई करावी. अन्यथा शिवसेना युवासेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी दिला आहे

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)