मित्राचा मित्रांकडून खून, घोटवडेच्या आमलेवाडीत घडली घटना

वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या वादातून राग मनात ठेवून केले कृत्य

पौड : वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून मित्रांनी मित्राचा काटा काढल्याची घटना आमलेवाडी-घोटवडे, ता.मुळशी येथे घडली. आमलेवाडी येथे ओंकार भालचंद्र भिंगारे (वय २५ वर्षे, रा.उरवडे, ता.मुळशी, जि.पुणे, सध्या रा.पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे) याचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला आहे. याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये आकाश शंकर येनपुरे (वय २८ वर्षे, रा.उरवडे, ता.मुळशी जि.पुणे, सध्या रा.बेलावडे, ता.मुळशी, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पौड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही १८ जुलै रोजी फिर्यादी आकाश शंकर येनपुरे याचा वाढदिवसाच्या पार्टीत अवि उर्फ चिलाप्या चव्हाण याच्यावरून ओंकार भिंगारे व गणेश भंडलकर यांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून वाद मिटवण्यासाठी आमलेवाडी येथे ओंकार भालचंद्र भिंगारे याला बोलावण्यात आले होते. वाद मिटवण्यासाठी जमा झालेल्या मधील गणेश भंडलकर (रा.उरवडे, ता. मुळशी, जी पुणे), ओंकार जाधव (रा.उरवडे, ता.मुळशी, जि. पुणे)सनी चव्हाण (रा.आंबेगाव-उरवडे, ता.मुळशी, जि.पुणे), अक्षय शेलार (रा.बोतरवाडी, उरवडे ता.मुळशी, जि.पुणे), सचिन भंडलकर (रा.उरवडे, ता.मुळशी, जि. पुणे), किरण ओव्हाळ (रा.उरवडे ता. मुळशी जि. पुणे) व इतर अनोळखी दोघे यांनी भांडणाचा राग मनात धरून रागाच्या भरात कोयते, रॉडने ओंकार भालचंद्र भिंगारे याच्या डोक्यात, मानेवर, पाठीत, तोंडावर वार करत त्याला ठार मारण्यात आले.

     या घटनेतील आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम करत आहे.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)