कोळवणपर्यंतची पीएमपीएमएल सेवा काशीगपर्यंत न्यावी

मुळशी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी

पुणे : मुळशी तालुक्यातील कोळवण पर्यंत येणाऱ्या पीएमपीएमपीएमएल बसेस काशीग पर्यंत याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली आहे. कोळवणपर्यंत येणाऱ्या पीएमपीएमएल बसेस काशीग पर्यंत आल्यास त्याचा फायदा विद्यार्थीमहिला, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी आणि ग्रामस्थांना होणार आहे. शिवसेनेने हे आपल्या मागणीचे निवेदन पीएमपीएमएल विभागाला दिले आहे.

         यावेळी तालुका प्रमुख सचिन खैरे, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले, तालुका समन्वयक नामदेव टेमघरे, उपतालुका प्रमुख अनंता वाशिवले, उपतालुका प्रमुख पांडुरंग निवेकर, नितीन लोयरे, संतोष लोयरे, सचिन सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

         कोळवण ते काशिग हे अंतर फार कमी आहे तसेच हा रस्तादेखील चांगला आहे. विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, महिला वर्ग यांचा करिता महत्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर पीएमपीएमएलच्या गाड्या काशीगपर्यंत चालू कराव्यात, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)