कोयता गॅंग म्हणून व्हिडीओ व्हायरल होताच पौड पोलिसांनी केले अटक

पिरंगुट : तलवार, कोयता व गुप्ती अशी हत्यारं घेऊन फिरत असताना काही तरुणांचा पिरंगुट येथील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. त्यानुसार संबंधित दहशत माजवणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच दहशतवाद विरोधी पथक व पौड पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून संबंधित तरुणांना अटक केली आहे.

      आकाश राजू पवार (वय २७ वर्ष), ऋषिकेश गणेश हुशार (वय २५ वर्ष), ऋषिकेश सुनील तोंडे (वय २३ वर्ष), ऋषीकेश देविदास कांबळे (वय २१ वर्ष), गणेश तुकाराम माने (वय २५ वर्ष), सर्व रा. पिरंगुट, सहकार नगर व असिफ मुबारक मुलाणी (वय १९) रा.उरवडे ता.मुळशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे १ लोखंडी तलवार, ३ कोयते, १ गुप्ती, १ मोबाईल असा मुद्देमाल सापडला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस शिपाई मोसीन बसीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पौड पोलीस स्टेशनमध्ये भादवि १८९ (१), (२), (४), १९० सह कलम ४/२५ प्रमाणे गु.र.नं. ३९०/२०२४ असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

      ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, हवेली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावीदहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, एटीएस पुणे ग्रामीण पोलीस शिपाई मोसीन बशीर शेख, पोलीस हवालदार प्रशांत बुनगे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पौडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण करत आहेत.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)