खुबवली येथे स्विफ्ट गाडीने दोघांना उडवले, दोन जण जखमी

भाजप तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे यांच्याकडून अपघात, जखमींना शिवीगाळ

4,096 BEST Traffic Accident Cartoon IMAGES, STOCK PHOTOS & VECTORS | Adobe  Stock 

पौड : भाजप मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे यांच्या स्विफ्ट गाडीने रस्त्याकडेला थांबलेल्या दोघांना उडवले. यात नवनाथ मारुती ठोंबरे (वय ४०) व अक्षय दिलीप गायकवाड (वय माहीत नाही) हे जखमी झाले आहेत. २२ जानेवारी रोजी खूबवली, ता.मुळशी येथे सायंकाळी ७.३० च्या दरम्यान ही घटना घडली.
            नवनाथ मारुती ठोंबरे व अक्षय दिलीप गायकवाड हे दोघे खूबवली येथे रस्त्याच्या कडेला गप्पा मारत होते. यावेळी नवनाथ हे त्यांची मोटार सायकल (क्र.एम एच १२ डी के ४४३८) यावर बसुन व अक्षय हे उभे राहून बोलत असताना विनायक नाथा ठोंबरे यांच्या स्विफ्ट कारने (क्र.एम एच १२ क्यु टी ५६९०) पाठीमागून भरधाव वेगात उडवले. त्यामुळे अक्षय बाजूला उडून पडला व त्याच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड मोडल्याने फ्रॅक्चर झाले आहे. यावेळी स्विफ्ट गाडीत असलेल्या आकाश उत्तम ठोंबरे, उत्तम लक्ष्मण ठोंबरे, प्रभा उत्तम ठोंबरे (सर्व रा.खुबवली ता.मुळशी) यांनी नवनाथ यांना शिविगाळ केली. तसेच आकाश यांने फिर्यादीस हाताने मारहाण केली व अक्षय गायवाड यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावरून नवनाथ ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.
           याबाबत पोलीस हवालदार होळकर यांनी फिर्याद दाखल करून घेतली असून पोलीस हवालदार सपकाळ पुढील तपास करत आहे. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांना दिली. 

........................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)